Wed, Feb 26, 2020 02:57होमपेज › Konkan › सिंधु कृषी प्रदर्शनात साडेपाच कोटींची उलाढाल

सिंधु कृषी प्रदर्शनात साडेपाच कोटींची उलाढाल

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:31PM

बुकमार्क करा

कुडाळ ः शहर वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या सर्व महोत्सव प्रदर्शन व मेळाव्याच्या गर्दीचा उच्चांक यावर्षीच्या सिंधु पशु-पक्षी प्रदर्शन व मेळाव्याने मोडीत काढला आहे. या प्रदर्शनाला यंदा 1 लाख 75 हजार पर्यटक, शेतकरी, पशुपालक व जिल्हावासीयांनी भेट दिली तर सुमारे साडेपाच कोटी रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमाचे पुढचे पाचवे वर्ष असून  आपण पदावर असेन - नसेन, पण  पुढील वर्षीचे पाचवे प्रदर्शनही दिमाखात व मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या पार पाडू, असा विश्‍वास जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी व्यक्‍त केला. कुडाळ एस.टी. डेपो मैदानावर गेले पाच दिवस सुरू असलेल्या सिंधु कृषी औद्योगिक, पशु-पक्षी, मत्स्य व्यवसाय प्रदर्शन व मेळाव्याचा समारोप मंगळवारी सायंकाळी झाला. या प्रदर्शनाचे सर्वेसर्वा जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या उपक्रमाबाबत माहिती 
दिली.