Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Konkan › चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अतिप्रसंग

चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अतिप्रसंग

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:07PMचिपळूण : खास प्रतिनिधी

शहरालगत वाशिष्ठी नदीकिनारी असणार्‍या एका गावात अल्पवयीन चिमुरडीला चॉकलेट देतो असे आमिष  दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी नाहीद आसिफ सुर्वे ऊर्फ चिन्‍नू (25,रा. मजरेकाशी) याला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. 

एक आठ वर्षीय चिमुरडी चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेली असता दुकानात असलेल्या युवकाने तुला आणखी चॉकलेट देतो, असे आमिष दाखविले. यानंतर दुकानात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत संबंधित पोलिसपाटलांनी चिपळूण पोलिसांना खबर दिली. या नंतर आरोपी चिन्‍नू याच्याविरोधात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.