Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Konkan › वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेची बाजी!

वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेची बाजी!

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:23PM

बुकमार्क करा
वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यात दुसर्‍या टप्प्यात झालेल्या मातोंड, पेंडूर, खानोली, वायंगणी या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मातोंड, पेंडूर व वायंगणी या तीन ग्रा. पं. वर शिवसेनेने तर खानोलीमध्ये गाव विकास पॅनेलने बाजी मारली. या चारही ग्रामपंचायतीची मतमोजणी बुधवारी वेंगुर्ले तहसील कार्यालयात झाली.

वेंगुर्ले तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींची निवडणुका ऑक्टोबरमध्ये पार पडल्या होत्या. दुसर्‍या टप्प्यातील मातोंड, पेंडूर, खानोली, वायंगणी या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मंगळवारी (दि.26) पार पडल्या. तर तिसर्‍या टप्प्यात आरवली, सागरतीर्थ व मोचेमाड या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.  ग्रामपंचायत निहाय विजयी सरपंच व सदस्य पुढीलप्रमाणे -खानोली ग्रामपंचायत - सरपंच - प्रणाली खानोलकर (278 मते), सदस्य - प्रभाग 1  प्रतिभा खानोलकर (बिनविरोध), किशोर वरक (78 मते), प्रभाग 2 - नम्रता केरकर (बिनविरोध), गणपत केरकर (105 मते), प्रभाग 3 - सुभाष खानोलकर (180 मते),  स्वाती खानोलकर व शीतल पवार (बिनविरोध).

मातोंड ग्रामपंचायत - सरपंच - जान्हवी परब (856 मते), सदस्य - प्रभाग 1 - दयानंद वेंगुर्लेकर (315 मते), अस्मिता परब (418 मते),  सुभाष सावंत (337 मते), प्रभाग 2 - सीताराम जाधव (358 मते), सुवर्णलता जबडे (306 मते), महानंदा घाडी (290 मते), सुश्मिता परब (301 मते), सुविधा नेमण (290 मते), वासुदेव कोंडये (221 मते).

वायंगणी ग्रामपंचायत - सरपंच - सुमन कामत (284 मते), सदस्य - प्रभाग 1 - आत्माराम साळगांवकर (148 मते),  निर्मला राऊत (163 मते),  पुरुषोत्तम कोचरेकर (224 मते), प्रभाग 2 -रेश्मा मुणनकर (171 मते), सतीश कामत (194 मते), आनंद दाभोलकर (184 मते), प्रभाग 3 - योगीता तांडेल (बिनविरोध), शारदा करंगुटकर (195 मते), स्नेहजा मुणनकर (224 मते).पेंडूर ग्रामपंचायत - सरपंच - गीतांजली कांबळी (634 मते), सदस्य - प्रभाग  1 - प्रमोद शिरोडकर (198 मते), सविता वैद्य (191 मते), नीलेश वैद्य (174 मते), प्रभाग 2 - शुभांगी नेमण (195 मते), प्रितम नाईक (186 मते), महेंद्र नाईक (186 मते), प्रभाग 3 - सुहासिनी सातार्डेकर (262 मते), मनिषा सावंत (264 मते), संतोष गावडे (252 मते).