Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Konkan › रामदास कदम यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी

रामदास कदम यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी

Published On: Apr 21 2018 11:15PM | Last Updated: Apr 21 2018 11:14PMचिपळूण : शहर वार्ताहर

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची जबाबदारी सोपवली आहे.  

आगामी निवडणुका लक्षात घेता ना. कदम यांच्यावर संपूर्ण राज्यात संघटना बळकट करण्याची जबाबदारी सोपविली आहे. एकूणच संघटनेअंतर्गत राज्याची जबाबदारी कदम यांच्यावर असून ते आपल्या सोबतच राज्यातील दौर्‍यात सहभागी असतात, असेही सांगितले.

औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांना  तक्रारीमुळे औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून दूर केलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघटना बळकट करण्याची व वाढविण्याची ताकद त्यांच्यात आहे. जेथे संघटना कमी पडते तेथे संघटना मजबूत करण्याचे काम कदमच करू शकतात. आजवर त्यांनी संघटनेला अशा ठिकाणी भरघोस यश मिळवून दिले आहे, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी करतानाच संघटना अंतर्गत संपूर्ण राज्याची जबाबदारी ना. कदम यांच्यावर देऊ, असे सांगितल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे. कदम यांच्या सेनेवरील निष्ठेचा व शिवसैनिक म्हणून त्यांच्या अंगी असलेल्या कार्यकर्त्याच्या धडाडीवर एकप्रकारे विश्‍वास असल्याचे बोलले जात आहे. 

कदम यांनी संघटनेसाठी पडत्या काळात आपल्या परखड व आक्रमक भूमिकेच्या माध्यमातून संघटनेची गळती व पडझड रोखण्यात फार मोठे योगदान दिले आहे. दहा वर्षांपूर्वी पहिल्या फळीतील काही दिग्गज नेते संघटना सोडून गेले. संघटनेत अस्वस्थता निर्माण झाली होती. अशावेळी ना. कदम यांनी कोणतीही जबाबदारी नसताना संघटनेची पडझड व गळती रोखण्याचे काम केले.

शिवसेनेवरील एकनिष्ठता व शिवसैनिक म्हणून आक्रमक भूमिका घेतानाच संघटनेत शिवसैनिक कार्यकर्ता कसा जोडला जाईल, याची राजकीय रणनीतीदेखील त्यांनी वापरली. संघटना कमकुवत करण्याचा काही स्वकीयांचा व विरोधकांचा डाव त्यांनी अनेकदा उधळून लावला. 

कदम यांची आक्रमक वक्‍तृत्व शैली व एखाद्या विषयावर केलेले मुद्देसूद वक्‍तव्य यातूनच संघटनेला बळकटी येऊ लागली. त्यांनी मांडलेले मुद्दे व केलेल्या टीका यांना प्रत्युत्तर देण्याचे धाडस त्यांच्यात आहे. त्यामुळेच संघटना बळकटीकरणासाठी ठाकरे यांनी कदम यांच्यावर विश्‍वासाने जबाबदारी टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाणारचा लढा होणार तीव्र

जिल्ह्यातील नाणार येथे होणार्‍या रिफायनरी प्रकल्पाविरोधात येथील जनतेत असंतोषाचा भडका वाढत आहे. नाणारच्या राजकीय रणावर शिवसेना उतरणार आहे. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख नेते विरोधाच्या लढ्यात उतरले आहेत. शिवसेनेकडून होणार्‍या विरोधात आता रामदास कदम यांची भर पडणार आहे.