Sun, Mar 24, 2019 13:09होमपेज › Konkan › शिवसेना आचरा गावच्या विकासासाठी कटिबद्ध :  शिंदे

शिवसेना आचरा गावच्या विकासासाठी कटिबद्ध :  शिंदे

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 8:27PMआचरा : वार्ताहर

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाशी रात्रीच्यावेळी हातमिळवणी करून नंतर स्वाभिमान पक्षाचे गोडवे गाणारे शशांक मिराशी हे नक्की कोणत्या पक्षाचे आहेत? हे त्यांनी जाहीर करावे. आ.वैभव नाईक यांनी आचरा आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका दिल्यावर शशांक मिराशी यांना पोटशूळ उठल्यामुळेच ते बेताल वक्‍तव्य करत असल्याची टीका मालवण शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे व विनायक परब यांनी पत्रकार परिषदेत केली.

नारायण कुबल, जगदीश पांगे, उदय दुखंडे, नितीन घाडी, शाम घाडी, समीर लब्दे, दिलिप पराडकर, ग्रा.पं. सदस्य अनुष्का गावकर, दिव्या आचरेकर, योगेश गावकर उपस्थित होते. बबन शिंदे म्हणाले, श्री.केणी यांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये. शिवसेना पक्षात घेतले जाणारे निर्णय हे कार्यकर्त्यांना विचारात घेवूनच घेतले जातात. आचरा ग्रा.पं.तील पराभव आम्हाला मान्य असून आचरा गावातील विकासाचा धडाका पालकमंत्री केसरकर, आ.नाईक व खासदारच्या सहकार्याने कायम चालूच ठेवणार आहोत. मंदार केणी यांनी शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा आपली कार्यकर्त्यांत किती पत शिल्लक आहे तपासून पहावी.आचरा ग्रा.पं. निवडणुकीपूर्वी शशांक मिराशी हे रात्रीच्यावेळी घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांबरोबरच्या बैठकीत स्वाभिमान पक्षाला धडा शिकवण्याची भाषा बोलत होते. असे एका रात्रीत शब्द फिरवणारे मिराशी यांना आचरेवासीय ओळखून आहेत असा टोला विनायक परब यांनी लगावत  मिराशी हे नक्की कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केले.

ते पुढे म्हणाले, आचरा मच्छीमार्केटचे श्रेय हे आ. किरण पावसकरांना आम्ही देतो.  त्यांच्या प्रयत्नातूनच हे मार्केट झाले आहे, हे आम्हाला मान्य आहे. आ.वैभव नाईक यांनी उद्घाटन करताना आ. किरण पावसकर यांना सांगूनच करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.त्यानुसार आठ दिवसांत आचरा मच्छीमार्केट आ. किरण पावसकर यांना विश्‍वासात घेवून शिवसेना स्टाईलने ओपन करणार असल्याचे शिंदे म्हणाले. 

Tags: Shivsena, committed, development, Achra village,Konkan News