Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Konkan › देवगडमध्येही शिवसेनेचे वर्चस्व!

देवगडमध्येही शिवसेनेचे वर्चस्व!

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:39PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेने सर्वाधिक चार  तर भाजपा, समर्थ विकास पॅनेल व गाव विकास पॅनेलने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. दिग्गजांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या  या निवडणुकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी वळीवंडे ग्रामपंचायत, माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिरवली ग्रामपंचायत स्वत:कडे राखली तर सभापती जयश्री आडीवरेकर यांचे होमपीच असलेल्या फणसगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजपा पुरस्कृत पॅनलला पराभवाचा झटका बसला. माजी उपसभापती नासीर मुकादम हे  रामेश्‍वर सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले.

तालुक्यातील वळीवंडे, वानिवडे, शिरवली, रामेश्‍वर, विठ्ठलादेवी, पावणाई, फणसगांव या सात ग्रामपंचातीच्या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी तहसील कार्यालयात झाली. यामध्ये वळीवंडे, वानिवडे, पावणाई व विठ्ठलादेवी या चार ग्रामपंचायतीवर  शिवसेनेने दावा केला असून रामेश्‍वरमध्ये स्वाभिमान, फणसगांवमध्ये गाव पॅनेल तर शिरवलीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाल्या आहेत.
ग्रामपंचायतनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-

शिरवली- सरपंच- भक्‍ती जठार(177 विजयी), सुचिता  मोहिते(57). वळीवंडे सरपंच - अर्चना घाडी(249 विजयी), पूजा घाडी(140), शरय सावंत(154). प्रभाग 1 - मिलींद  मोंडकर(72 विजयी), महेंद्र तेली(40), सुहास मिठबांवकर(58)

तेजस्विनी सावंत(63 विजयी), सायली  देसाई(58), संचिता सावंत(49). प्रभाग 2- समिता  तेली(96 विजयी), सविता तेली(33). प्रभाग 3 - राजेश घाडी(126 विजयी), सुरेश घाडी(67), राजेंद्र सावंत(123 विजयी), जितेंद्र  सावंत(51)प्रकाश सावंत(78 विजयी), प्रवीण  सावंत(38), कल्पना सावंत(110 विजयी), सायली देसाई(56). वानिवडे सरपंच- प्राची  घाडी(274 विजयी), स्वागता  सरवणकर(184). प्रभाग 1- वैष्णवी बांदकर(58 विजयी), संजना हरम(52), माधवी  वाडेकर(64 विजयी), प्राजक्ता  सरवणकर(46). फणसगांव सरपंच- सायली कोकाटे(552 विजयी), नयना महाडिक(203).

प्रभाग 1- सिध्दी पाटील(145 विजयी), दर्शना लांजवळ(56), कृष्णकांत  आडिवरेकर(141 विजयी), जयवंत  आडिवरेकर(61). प्रभाग 2- वंदना नरसाळे(136 विजयी), राजश्री कदम(63), गौरी जगताप(29), सुजाता पेंडूरकर(165 विजयी), देवयानी मेस्त्री(67). प्रभाग 3- उदय  पाटील(206 विजयी), राजेंद्र  धुरी(178 विजयी),दीपक  मेस्त्री(75),दीपक ठुकरूल(59), सरीता आग्रे(204 विजयी), सविता धुरी(112). रामेश्‍वर सरपंच - विनोद सुके(337 विजयी), संतोष ठुकरूल(324), प्रकाश पुजारी(308), दीपक आदम(45), नासीर मुकादम(144). प्रभाग 1- तन्वी  नरसाळे(203 विजयी), संजना धुमाळ(192), वषा देवधर(84). सुविधा पुजारे(208 विजयी), सानिका पुजारे(189), पूर्वा  बाणे(69), अजित पुजारे(226 विजयी), सुरेश पुजारे(175), संदीप बाईत(71). प्रभाग 2- रमेश अनसुरकर(140 विजयी), योगेश ठुकरूल(128), मिनेश मोंडे(111), भक्‍ती घारकर(144 विजयी), निकिता केळकर(132), वेदिका  ठुकरूल(105). दीपक पुजारे(145 विजयी), 

पंकजकुमार पुजारे(121). प्रभाग 3- फर्नांडीस कोजमा(137 विजयी), अशोक आदम(122), किंगजॉन  परेरा(37). उजमा  मुकादम(162 विजयी), वर्षा  देवधर(71), भक्‍ती घारकर(27), पेरपतीन परेरा(34). पावणाई सरपंच - गोविंद  लाड(336 विजयी), सुधीर  धुरी(68), प्रभाग 1- सुधीर धुरी(59  विजयी), गोविंद लाड(27) . विठ्ठलादेवी सरपंच- दिनेश नारकर(241 विजयी), संतोष नारकर(174), दिपाली नारकर(15). प्रभाग 1- जयश्री नारकर(26 विजयी), स्वप्ना नारकर(25). प्रभाग 2- प्रिया बारवकर(127 विजयी), दिपाली  नारकर(23), एकनाथ कार्लेकर(110 विजयी), बाळकृष्ण येरम(43).  प्रभाग 3- विजयकुमार नारकर(134 विजयी), प्रदीप नारकर(120 विजयी), देवेंद्र  नारकर(112), शांताराम राणे(70), साक्षी नारकर(116 विजयी), सविता नारकर(79), दिपाली नारकर(23)

मतमोजणी इमारतीबाहेर व तहसीलल परिसरात राजकीय कार्यकर्ते, नेतेमंडळी, ग्रामस्थांनी गर्दी केली होती.  चार ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत सरपंच विजयी होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. सेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलींद साटम, जि.प.सदस्या सौ.वर्षा पवार, प्रदीप नारकर आदी नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.   स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष डॉ.
अमोल तेली, युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, संजय बोंबडी आदी उपस्थित होते.रामेश्‍वर ग्रामपंचायत समर्थ विकास पॅनेलच्या ताब्यात आल्याने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा त्यांनी सत्कार केला.