Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Konkan › नाणार विरोधातील उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण(व्हिडिओ) 

नाणार विरोधातील उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्ण(व्हिडिओ)

Published On: Apr 23 2018 10:42AM | Last Updated: Apr 23 2018 11:19AMराजापूर : लक्ष्मीकांत घोणसेपाटील  

शिवसेनेने नाणार रिफायनरीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली असून, स्थानिकांना पाठबळ देण्यासाठी आज (दि 23) सागवे येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत नाणार प्रकल्पविरोधातील रणनीती ठरणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या गावागावांत संघर्षाच्या मशाली पेटल्या आहेत. तशात उद्धव ठाकरे आज नाणारमध्ये येत असल्याने या संघर्षाला अधिकच धार चढली आहे. 

दरम्यान, नाणारच्या सभेसाठी तयारी पूर्ण झाली असून, उद्धव ठाकरे काय बोलणार? प्रकलग्रस्त या सभेला येणार की नाही याची चर्चा सुरु आहे, त्यामुळे  उद्धव ठाकरे  यांच्या सभेकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 

Tags : Shivsena Party chief, uddhav thackeray,  indhudurg rajpur rifaynri project