Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Konkan › सरकारवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ

सरकारवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ

Published On: Mar 26 2018 1:30AM | Last Updated: Mar 25 2018 10:53PMरत्नागिरी : प्रतिनिधी

विविध राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. चंद्राबाबू नायडू सत्तेतून बाहेर पडले. त्यापाठोपाठ एक-एक पक्ष बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे देशातील सरकारला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, अशी खोचक टीका शिवसेना खा. आनंदराव अडसूळ यांनी केली.

श्री लक्ष्मीकेशव विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी रविवारी खा. अडसूळ रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. सन 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपने घटक पक्षांना सोबत घेऊन लढली. परंतु, सत्तेवर आल्यावर त्यांना आकाश ठेंगणे झाले. विद्यमान सरकार कोणालाही विश्‍वासात न घेता निर्णय घेते. त्यामुळे घटक पक्षा नाराज होत आहेत, असे खा. अडसूळ म्हणाले. देशासह राज्यात एकाच वेळी निवडणुका होतील, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवले. भाजपला निवडणुकीवेळी ज्यांनी साथ दिली, त्या घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नसल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक मुदतपूर्व होईल की नाही हे आत्ताच सांगणे शक्य नाही. परंतु, महाराष्ट्रात विधानसभा, लोकसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. 

Tags : Ratnagiri, Shivsena, MP Anandrao Adsul, Targeat, bjp, government,