Sat, Feb 23, 2019 21:17होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधात सेना ठोकणार शड्डू

रिफायनरी विरोधात सेना ठोकणार शड्डू

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 10:35PMराजापूर : प्रतिनिधी

शासनाने कोकणवासीयांच्या माथी लादलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध शिवसेना पूर्ण जोमाने उतरणार असून शनिवार 3 फेब्रुवारीला  सायंकाळी 4 वाजता डोंगर तिठ्यावर सेनेची जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी शिवसेनेकडून प्रकल्प हटावची जोरदार मागणी केली जाणार आहे.

केंद्र व राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेवर मागील काही दिवसांपासून टीका सुरु असून शिवसेनेकडूनदेखील त्या टीकेला सडेतोड उत्तर दिले जात आहे. त्यामुळे आरोप - प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आता रिफायनरीच्या विरोधात अधिक जोमाने  उतरली असून खासदार विनायक राऊत यांची जाहीर सभा शनिवार दि. 3 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता डोंगर तिठ्यावर आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी आ. राजन साळवी, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आ. गणपत कदम, जि. प. शिक्षण सभापती दीपक नागले यासह शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेने सुरवातीपासूनच रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. स्थानिक जनतेला हा प्रकल्प नको असेल तर आमचा विरोधच राहिल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. स्वत:  पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनींही रिफायनरी विरोधात मत व्यक्‍त केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डोंगर तिठ्यावर होणार्‍या सभेत शिवसेनेकडून प्रकल्पाला  विरोध केला जाणार आहे. त्या सभेत प्रकल्पाविरोधात शासनाचा कसा समाचार घेतला जातो,याची उत्सुकता आहे.