Mon, Nov 19, 2018 01:05होमपेज › Konkan › प्रकल्प रद्द करण्याची कुवत सेनेत नाही : नीलेश राणे 

प्रकल्प रद्द करण्याची कुवत सेनेत नाही : नीलेश राणे 

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:22PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतचा शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे़  हा प्रकल्प रद्द करण्याची कुवत त्यांच्यात नाही. प्रकल्पग्रस्त अंगावर येऊ 
लागल्यावरच सेनेने प्रकल्पाला विरोध सुरू केला़  रिफायनरीबाबत सेनेची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचे प्रतिपादन स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.
‘रायगड’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़. रिफायनरी प्रकल्पाला येथील 14 गावांतील प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे़  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षदेखील प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी सुरुवातीपासूनच ठामपणे उभा आहे़ पेट्रोकेमिकलच्या माध्यमातून येणारा प्रदूषणकारी काळा धूर कोकणच्या माथी नको, अशी पक्षाची भूमिका आहे.