Wed, Apr 24, 2019 15:59



होमपेज › Konkan › शिवसेनेचे अशोक सप्रे भाजपत

शिवसेनेचे अशोक सप्रे भाजपत

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 10:36PM




देवरूख : वार्ताहर 

देवरूख नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने शिवसेनेला तालुकास्तरीय झटका दिला आहे. शिवसेनेचे तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी पं.स.सदस्य आणि माजी उपतालुकाप्रमुख अशोक  सप्रे यांनी शुक्रवारी संध्याकाळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

रायगडचे पालकमंत्री आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे पालकत्व असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील हॉटेल द्रौपदीच्या सभागृहात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, सदानंद भागवत, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, संतोष शिंदे, नगरसेविका निकिता रहाटे, नाना शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद जोशी, शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, तालुका सरचिटणीस अमित केतकर, कुंदन कुलकर्णी, रा.स्व.संघाचे चंद्रकांत जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे नगरसेवक दत्ताराम कांगणे आणि नगरसेविका मेधा बेर्डे यांना शिवसेनेने पावन करून घेत भाजपला धक्‍का दिला होता. त्याची सव्याज परतफेड काल भाजपने केली आहे. त्यांच्यावर देवरूख नगर पंचायत निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे.

URL : Shiv Sena, Ashok Sapre, BJP, knokan news