Fri, Nov 16, 2018 11:51होमपेज › Konkan › कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात (Video)

कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात (Video)

Published On: Mar 02 2018 12:56PM | Last Updated: Mar 02 2018 12:56PMगिमवी : प्रतिनिधी

कोकणात गणेश चतुर्थीप्रमाणेच होळी उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमगोत्सवानिमित्त गावागावंत होम लावले जातात. त्यांनतर पालखी नाचवली जाते. गिमवी येथे या उत्सवात राज्याचे माजी मंत्री, आमदार भास्करराव जाधव यांनी पालखी नाचवली.

कोकणात सध्या मोठ्या उत्साहात शिमगोत्सव सुरु आहे. कोकणातील लोक कुठेही असले तरी दरवर्षी न चुकता या उत्सवासाठी गावाकडे येतात. आपल्या कुटुंबासह हा सण ते साजरा करतात. राज्याचे माजी मंत्री, आमदार श्री. भास्करराव जाधव त्यांच्या तुरंबव गावच्या सहाणेसमोर होम लागल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी नाचविण्यात आली.