Sun, Nov 18, 2018 13:23होमपेज › Konkan › शेखर सिंह यांची गडचिरोली जिल्हाधिकारीपदी बदली

शेखर सिंह यांची गडचिरोली जिल्हाधिकारीपदी बदली

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:24PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शेखर सिंह यांची गड़चिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून बढ़तीने बदली झाली असून, शनिवारी त्यांनी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटिल यांच्याकडे सुपुर्द केला. शेखर सिंह यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार 25 जून 2016 रोजी स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या या अडिच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपला एक वेगळा असा ठसा उमटविला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छ जिल्ह्याचा बहुमान मिळउन देण्यात सिंह यांचा सिंहाचा वाटा होता.  एक कणखर आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून शेखर सिंह यानी आपला ठसा उमटविला होता. श्री सिंह यांची गडचिरोली चे जिल्हाधिकारी म्हणून बढती झाली आहे.

बी.जी.पवार नूतन सीईओ

सिंधुदुर्गचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून गृह निर्माण विभागाचे सय्युक्त सचिव बी. जी. पवार यांची नियुक्ती झाली आहे.

श्री सिंह यांच्याकडून पुढारीस शुभेच्छा

   दै. पुढारिचा वर्धापन दिन 1 जानेवारी ला असून या वर्धापन दिनासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांबरोबरच श्री सिंह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्यांची बदली झाल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहु शकणार नसल्याने श्री सिंह यांनी दै. पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त ख़ास शुभेच्छा दिल्या आहेत.