Thu, Jul 18, 2019 21:21होमपेज › Konkan › शिक्षण हे सर्व गोष्टींवर मात करणारे अस्त्र : नारायण राणे

शिक्षण हे सर्व गोष्टींवर मात करणारे अस्त्र : नारायण राणे

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:26PMदेवगड : प्रतिनिधी

शिक्षण हे सर्व गोष्टींवर मात करणारे अस्त्र आहे. यामुळे स्पर्धेमध्ये टिकणारे विद्यार्थी घडवून कोकणामधून उद्योजक निर्माण झाले पाहिजेत.यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वास वाढवून दर्जेदार शिक्षण घेऊन त्या दृष्टीकोनातून वाटचाल केली पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देवगड येथील शेठ म.ग.हायस्कुलच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी व्यक्‍त केले. 

शेठ म.ग.हायस्कुल शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आ. नितेश राणे, देवगड एज्युकेशन बोर्डाचे अध्यक्ष अरुण जोशी, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, माजी आ. अजित गोगटे, डॉ. के. एन.बोरफळकर,अ‍ॅड अविनाश माणगावकर, अ‍ॅड.विजय चौगुले, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शाळेचे मुख्याध्यापक संजीव राऊ त, सदानंद पवार,संतोष धुरी, विजयकुमार फडके, मिलिंद कुबल आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी दूरदृष्टीचा विचार करुनच शिक्षण घेतले पाहिजे. कोकणामध्ये शैक्षणिक दर्जा वाढला आहे,मात्र हे विद्यार्थी  स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकत नाहीत. यासाठी इंग्रजी विषयाचा दर्जा वाढवून ती आत्मसात करणे  महत्वाचे आहे. देवगड हायस्कूलचा शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. ही शाळा मफतलाल गगलभाई या उद्योजकाने बांधली असून यामुळेच या शाळेला शेठ म.ग.हायस्कुल असे नाव दिले गेले आहे. याच गोष्टीचा विचार करत  विद्यार्थ्यांनी आपणही शेठ मफतलाल गगलभाई यांच्यासारखे उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून वाटचाल केली पाहिजे. विवेकबुध्दी आणि दूरदृष्टीच्या माध्यमातून आपण भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे. शिक्षकांनी मुलांना घडविण्यासाठी दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे.
 शेठ म.ग.हायस्कूलचे  शताब्दी वर्ष साजरे करीत असताना या हायस्कूलच्या संस्थेचे देखील कौतुक केले पाहिजे. 100 वर्षे सुसज्ज इमारतीने शैक्षणिक सामुग्री कुठेही कमी नपडता हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या या संस्थेचेही फोर मोठे योगदान समाजाला व येथील परिसराला लाभले आहे. हजारो विद्यार्थी या संस्थेच्या  माध्यमातून घडले आहेत. यामुळे या संस्था चालकांचेही आभार मानणे हे  महत्त्वाचे आहे.

आ. नितेश राणे म्हणाले, सर्व सोयींनी युक्‍त अश शेठ म.ग.हायस्कूलने अनेक विद्यार्थी 100 वर्षामध्ये घडविले असून पुढेही हे काम अविरतपणे  सुरू रहाणार आहे. यातून खरी सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माध्यमातून जोपासली गेली आहे. शाळेच्या इमारतीबरोबरच या संस्थेने देणगीच्या माध्यमातून संकलित केलेल्या निधीचा चांगला विनियोग करुन शाळेमधील शैक्षणिक दर्जेदार साहित्य  विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले आहे.  विद्यार्थ्यांनीही आपली शैक्षणिक प्रगती करीत असताना या  स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये  टिकाव धरण्यासाठी त्या दृष्टीकोनातून शिक्षण दर्जेदार घेतले पाहिजे. देशाचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे. शिक्षणामध्ये जी ताकद आहे ती अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही.  सूत्रसंचालन संजय धुरी यांनी तर प्रास्ताविक डॉ.के.एन.बोरफळकर यांनी केले.  

राणे पिता- पुत्राकडून संस्थेला देणगी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शेठ म.ग.हायस्कूलच्या नवीन   इमारतीसाठी10 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तर इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यास आणखी देणगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आ. नितेश राणे यांनीही या शाळेच्या नवीन इमारतीला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर करुन या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर दुसर्‍या टप्यातील आणखी देणगी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.