होमपेज › Konkan › सव्वादोन वर्षांच्या बालिकेवर वृद्धाकडून लैंगिक अत्याचार

सव्वादोन वर्षांच्या बालिकेवर वृद्धाकडून लैंगिक अत्याचार

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 10:26PMमालवण : प्रतिनिधी

सव्वादोन वर्षांच्या बालिकेला खेळण्यासाठी म्हणून घरी नेऊन त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या फ्रान्सिस  बस्त्याव रिबेलो (रा. मेढा-मालवण)  या 66 वर्षीय वृद्धाला मालवण पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेने मालवणात एकच  खळबळ माजली आहे. 

मालवण शहरात राहणार्‍या फ्रान्सिस बस्त्याव रिबेलो याने 12 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास या बलिकेला खेळण्यासाठी म्हणून घरी आणले आणि घराच्या मुख्य हॉलमध्ये त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार त्या बालिकेच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित फ्रान्सिस रिबेलो याच्या विरोधात भादंवि कलम 376, 504, 509 अन्वेय तसेच लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4/8 नुसार गुन्हा दाखल करून फ्रान्सिस  रिबेलो याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन वर्षांच्या बालिकेवर एका वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त मालवणात पसरताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. सायंकाळी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.