होमपेज › Konkan › संगमेश्‍वरात तिळाची शेती झाली दुर्मीळ

संगमेश्‍वरात तिळाची शेती झाली दुर्मीळ

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 8:52PMआरवली : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील तिळाची शेती आता दुर्मीळ होत चालली आहे. औषधी म्हणून उपयोगात असलेल्या या शेतीची जोपासना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सपाट भागावर हमखास पीक देणारी म्हणून तिळाच्या शेतीकडे पाहिले जाते. शेतकरी पूर्वी भातशेती व नाचणीच्या शेतीबरोबरच तिळाची शेती करत असत. तिळाच्या तेलातून मिळणारे तीळ घाण्यावर दळून त्यापासून तेल काढले जात असे. हे ते विविध रोगांवर गुणकारी असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. तसेच काही शेतकरी या शुद्ध तेलाचा वापर अन्नपदार्थ बनविण्यासाठीही करीत होते. त्यामुळे शेतकरी तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. संगमेश्‍वर तालुक्यातदेखील काही वर्षांपूर्वी तिळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असे.

तिळाच्या शेतीमुळे ग्रामीण भागातील सपाट माळराने ही पिवळ्या रंगीत फुलांनी सजलेली आणि बहरलेली दिसायची. ही तिळशेती सध्या दुर्मीळ होऊ लागली आहे.