Tue, Nov 13, 2018 08:00होमपेज › Konkan › ग्रामीण पर्यटनासाठी 16 गावांची निवड

ग्रामीण पर्यटनासाठी 16 गावांची निवड

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:51PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला उभारी देण्यासाठी शासनाकडून ग्रामीण पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील 16 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती येथील पर्यटन विकास महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

ग्रामीण पर्यटन विकास योजनेतून निसर्गसौदर्यांची उधळण झालेल्या येथील समुद्रकिनारी भागात पर्यटक रिसॉर्ट, वॉटरस्पोर्ट्स उपक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावरून पावले उचलण्यात आली आहेत. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत जिह्यातील बाणकोट, वेळास, लाडघर, कुर्ली,  वेळणेश्‍वर, गणेशगुळे, उक्षी, भाट्ये, भालावली, गावखडी, काळबादेवी, देवीहसोळ, साखर, वाडापेठ, गोवळ, भडे या गावांचा पर्यटन विकास  आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी नवनवीन सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.