Mon, May 20, 2019 08:54होमपेज › Konkan › गतिरोधकावर स्कूटर आदळून स्वार ठार

गतिरोधकावर स्कूटर आदळून स्वार ठार

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 11:45PMबांदा : वार्ताहर

तोरसे (गोवा) येथून सावंतवाडी येथील भावाकडे डिओ स्कुटीवरून जात असताना बांदा-कट्टा कॉर्नर येथील गतिरोधकावर गाडी आदळल्याने अपघात झाला. यात राहुलकुमार अरुणकुमार सिंह (रा. राजखंड, बिहार) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री झाला.

राहुलकुमार हा फरशी बसविण्याचे काम करत होता. गेले काही दिवस तो तोरसे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. गुरुवारी होळीची सुट्टी असल्याने त्याने आतेभावासोबत दुपारी होळी साजरी केली. जेवण झाल्यानंतर आराम करून रात्री ते गोवा येथील एका हॉटेलमध्ये जेवण व मद्यपान करण्यासाठी गेले होते.

रात्री राहुलकुमार हा पुत्तलकुमार मंचन साहनी यांच्या मालकीची डिओ  घेऊन सावंतवाडी येथील भावाकडे जाण्यासाठी निघाला. बांदा-कट्टा कॉर्नर सर्कल येथे नव्याने घालण्यात आलेल्या उंच 
गतिरोधकाचा त्याला अंदाज न आल्याने वेगातच त्याची दुचाकी उडून रस्त्यावर आदळली.त्याबरोबर राहुलकुमारही रस्त्यावर आदळला.अपघात घडल्याचे 

समजताच उपस्थित स्थानिकांनी त्याला बांदा प्रा. आ. केंद्रात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ.जगदीश पाटील यांनी सांगितले.
ही बातमी त्याच्या भावाला समजताच त्याने  बांदा प्रा. आ. केंद्रात धाव घेतली.यावेळी त्याने राहुलच्या मृतदेहाला कवटाळून फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावून गेला. शुक्रवारी दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले अधिक तपास बांदा पोलिस करीत आहेत.