होमपेज › Konkan › शिक्षक मागणीसाठी पालकांचे उर्दू हायस्कूल बंद आंदोलन

शिक्षक मागणीसाठी पालकांचे उर्दू हायस्कूल बंद आंदोलन

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:05PM

बुकमार्क करा
सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी उर्दू सेमी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षक नसल्याच्या कारणाने  मंगळवारी पालकांनी शाळा बंद आंदोलन छेडले. तसेच संस्थेच्या अध्यक्षांना पालकांनी कार्यालयात  कोंडून ठेवले. सावंतवाडी शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणीयार यांच्यासह पालक सकाळपासुन शाळेसमोर ठाण मांडून होते. स्थानिक  चेअरमन अब्दुल सलाम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असून काही दिवसांची मुदत दिल्यास शिक्षक भरती व मुलांना लागणार्‍या सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन दिले.

गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीबाबत पालकांनी वेळोवेळी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता. तरी दुर्लक्ष केल्याने पालक आक्रमक बनले. रजाक नाईक, खुदबुद्गीन मुल्ला, समीर पटेल, तन्सीब शेख, नजीरीन खान, रियाज काजरेकर, जवेरा खलील, जावेद शहा, रेहान खाव्जा, कबीर शेख, इरफान शेख, लियाकत शेख, रजीचा शहा, मुन्ना शेख, रिहाना खान, हसिना बागवान, रेश्मा बागवान, मिनाज शेख, परवीन मुजावर, समीर अन्सारी, रिहा पटेल, शकिला बेग, निलोफर बागवान, इस्लाम अन्सारी, अलिया बागवान, अनजरी शेख आदी शेकडो महिला व पुरुष पालक उपस्थित होते.

इंग्रजी विषयाच्या शिक्षक द्या,अशी मागणी पालकांनी केली. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत माघार नाही असा इशारा पालकांनी दिला. 171 मुले असलेल्या पाचवी  ते दहावीच्या वर्गातील या मुलांसाठी केवळ पाच शिक्षक आहेत. तर इंग्रजी या विषयाचा शिक्षक नसल्यामुळे अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी कसे  सामोरे जाणार? असा सवाल पालकांनी केला.   हे हायस्कूल शासन अनुदानीत असताना विद्यार्थ्यांच्या शौचालयासाठी अल्पसंख्यांक निधीतून सहा लाख रुपये मिळूनही दरवाजे का बसविले नाहीतत्त असा सवाल करत पालकांनी  संस्था चालकांची भेट घेतली असता याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले