Thu, Jul 18, 2019 13:03होमपेज › Konkan › भारतरत्न अटलजींच्या नावाने सामाजिक क्षेत्रात रचनात्मक काम : सुरेश प्रभू

भारतरत्न अटलजींच्या नावाने सामाजिक क्षेत्रात रचनात्मक काम : सुरेश प्रभू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर

देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे व ज्यांनी आपले सारे आयुष्य राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित केले ते  माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या नावाने सामाजिक क्षेत्रात आणि तेही  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रचनात्मक काम सुरु आहे. या कामाला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नकुल पार्सेकर, अटलचे सीईओ सुनील जोशी, पुणे व राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना तथा पुणेचे अध्यक्ष माऊली दारवटकर यांनी दिल्ली येथे उद्योगभवनात सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सामाजिक संस्थांनी एक एक गाव निवडून सरकारवर अवलंबून न राहता गावाचा विकास केला पाहिजे. ही संकल्पना घेऊन ना.प्रभू हे गेली कित्येक वर्षे समाजकारण व राजकारणात कार्यरत आहेत.

त्यामुळेच त्यांच्याच संकल्पनेवर आधारीत अटल प्रतिष्ठानने ग्रामविकासाचे एक नवीन मॉडेल तयार केलेले असून त्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी हे शिष्टमंडळ प्रभूंना भेटले. यावेळी कुडाळ येथे नव्याने सुरू होत असलेल्या जीएसटी गाईडन्स अकॅडमीच्या उद्घाटनाला प्रभू उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

 पॅनकार्ड क्लबच्यावतीनेही उपस्थित असलेले माऊली दारवटकर व नंदकुमार गावडे यांनी देशामध्ये कंपनीत ज्या लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत त्याबाबत निवेदन दिले. प्रभूंनी याप्रकरणी देशाच्या अर्थमंत्र्याशी बोलून कायदेशीर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.