Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Konkan › सावंतवाडी टर्मिनस’चे काम थांबविले

सावंतवाडी टर्मिनस’चे काम थांबविले

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 10:43PM

बुकमार्क करा
 सावंतवाडी : प्रतिनिधी  

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसच्या दुसर्‍या फेजचे काम थांबविल्याने मंगळवारी शिवसेना पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनमास्तर संतोष महाजन यांना जाब विचारला. मंजूर झालेल्या  निविदेनुसार रेल्वे टर्मिनसचे काम सुरू न केल्यास शिवसैनिक रेल्वे ट्रॅकवर उतरतील, असा लेखी  इशारा राऊळ यांनी दिला.  जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश परब, जि. प. सदस्य मायकल डिसोझा, पं. स . सदस्य मेघश्याम काजरेकर, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, युवा सेना शहराधिकारी समीर मामलेकर, एस. टी. सेना तालुकाधिकारी चंद्रकांत कासार, मंगलदास देसाई, दिलीप सोनुर्लेकर, सुनील देसाई, भाऊ देवळी, चंद्रकांत नेवगी, बाबू गावडे, सहदेव राऊळ, दाजी सावंत, विभागप्रमुख विनोद काजरेकर, विनोद ठाकूर, महेश शिरोडकर, योगेश नाईक, सुभाष मयेकर, दत्ताराम पेडणेकर, महेंद्र परब, प्रशांत बुगडे, शरद जाधव आदी सेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ प्रवासी उपस्थित होते.

जिल्ह्याचे सुपुत्र व तत्कालीन  रेल्वेमंत्री तथा विद्यमान वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे दोनदा भूमिपूजन केले. त्यानंतर टर्मिनसच्या पहिल्या फेजचे काम पूर्ण झाले. सध्या दुसर्‍या फेजमधील तिकीट घर व वेटिंग रूम इमारत कामाची निविदा जाहीर करण्यात आली.  दरम्यान, संबंधित  ठेकेदाराने कामही सुरू केले. मात्र, कोरे प्रशासनाने अचानक या कामासाठी  निधी नसल्याचे कारण दाखवून इमारतीसाठी उभारण्यात येणारे पिलरचे खड्डे बुजवून इमारत बांधकाम बंद करण्याचा परस्पर निर्णय घेतला. ही माहिती समजताच  शिवसेना आक्रमक झाली व त्यांनी रेल्वेस्टेशनला धाव घेतली. फंड नसल्यामुळे काम  थांबले