होमपेज › Konkan › चेन स्नॅचर सरताज इराणीला चार दिवसांची पोलिस कोठडी

चेन स्नॅचर सरताज इराणीला चार दिवसांची पोलिस कोठडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर

निवृत्त बँक अधिकार्‍यास भररस्त्यात लुटल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण शाळेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या हैदर सरताजअली इराणी याला येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, चैन स्नेचिंगमधील मास्टर माईंड असलेल्या हैदर इराणीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांबाबत गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक विश्‍वास काईंगडे यांनी रविवारी कसून चौकशी केली. 

काही दिवसांपूर्वी भटवाडी परिसरात निवृत्त बँक अधिकारी सदानंद निकम यांच्याकडील एक लाखाचे दागिने दोन अज्ञात इसमांनी लुटले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने   जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात कोल्हापूर- जयसिंगपूर येथील हैदर इराणी याला शनिवारी आंबोली परिसरातून अटक केली होती. रविवारी त्याला येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

 इराणीवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. निकम यांच्याजवळील दागिने लंपास केल्याची इराणी याने पोलिस तपासात चोरीची कबुली दिली असली तरी त्याच्या दुसर्‍या साथीदाराबाबत तो दिशाभूल करणारी माहिती देत आहे. चोरीतील मुद्देमाल व साथीदारांबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता दागिने साथीदाराजवळ असल्याचे त्याने सांगितले. आपण त्याला निट ओळखत नाही व तो ठाणे येथील असल्याची माहिती इराणी देत आहे. इराणी हा विसंगत माहिती देत असला तरी त्याच्या साथीदारास लवकरच ताब्यात घेवू असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील चोरीच्या इतर प्रकरणांबाबत इराणी याची चौकशी करण्यात आली.