Wed, Jan 16, 2019 18:16होमपेज › Konkan › लेप्टोसदृश तापामुळे आंबेगावात एकाचा मृत्यू

लेप्टोसदृश तापामुळे आंबेगावात एकाचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

आंबेगाव येथील गंगाराम न्हानू काळे (53) यांचा लेप्टोसदृश तापाने गोवा-बांबुळी येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी 
उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सावंतवाडी पं. स. सभापती रवींद्र मडगावकर यांनी दिली. 

तापसाथ रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला मडगावकर यांनी दिल्याचे सांगितले. गेले काही महिने जिल्ह्यात तापसरीचा फैलाव होत आहे. 
त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे; पण म्हणावे तेवढे यश आले नाही.