Wed, Apr 24, 2019 11:47होमपेज › Konkan › सावंतवाडीतील एसआयटी सेंटरला सव्वा कोटी

सावंतवाडीतील एसआयटी सेंटरला सव्वा कोटी

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 11:03PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

सावंतवाडी शहरात सुरू होणार्‍या एसआयटी सेंटर तथा युपीएससी प्रशिक्षण सेंटरला युवा उद्योजक हर्ष साबळे यांच्याकडून सव्वा कोटी रुपयांची रक्‍कम नगरपरिषदेला देण्याबरोबर न. प. च्या हेल्थपार्कचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी श्री. साबळे यांनी आजच्या पाहणी दौर्‍यात दर्शविली.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत सावंतवाडीत शहर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी देशी व परदेशी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने पाहणी दौरा केला. यात उद्योजक हर्ष साबळे,नगराध्यक्ष बबन साळगावकर,मुख्याधिकारी जयंत जावडेकर,न.प.चे बांधकाम अभियंता तानाजी पालव, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते .

न.प. ला एसआयटी सेंटरमधून गरीब व हुशार विद्यार्थ्यांना  स्पॉन्सरशीप देत या  मुलांना दर्जेदार व चांगले शिक्षण मिळावे तसेच या सेंटरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील 8 कॉलेजीसमधून दिसेल असे इंटरनेटवरुन जोडले जाणार आहे. यात प्रत्येकी 15 विद्यार्थ्यांना म्हणजेच 400 विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदा होणार आहे. सद्यस्थितीत या सेंटरला हार्डवेअरसाठी लागणारा 55 लाख  रुपये इतका निधी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच फर्निचर लगेच करुन घ्यावे अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.

याशिवाय विविध  बँका, इन्शुरन्स कंपन्यांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करवून घेताना लहान मुलांच्या नर्सरीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्याना क्वालिटी शिक्षण दिले जावे यासाठी हे एसआयटी सेंटर जिमखाना येथे उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 8 कॉलेजीस टायअप करुन जोडले जाणार आहेत.  सावंतवाडी शहरात पर्यटनदृष्ट्या विकास आणि स्पर्धा परीक्षा केंद्र लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी शिल्पग्राम, चिटणीस वाडा आणि स्पर्धा परीक्षा केंद्रस्थळी भेट दिली. सावंतवाडी शिल्पग्राम, हेल्थ पार्क पंचकर्म विभाग जलदगतीने सुरू व्हावे, म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर प्रयत्नशील आहेत.शिल्पग्राम एका उद्योजकाने करारावर घेतले असून तेथील पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे. त्याची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.सावंतवाडी शहरात हेरिटेज पर्यटन व्हावे म्हणून आणि पंचतारांकित पर्यटनासाठी उद्योजक हर्ष साबळे यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चिटणीस वाडा देखील दाखविला. त्यानंतर जिमखाना मैदानावरील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या स्थळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बीएसएनएलच्या मॅनेजरशी चर्चा करून आठ विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्रातील थेट मार्गदर्शन मिळावे म्हणून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये बँकिंग सारख्या परीक्षा आणि लहान मुलांना  मार्गदर्शन देणारे केंद्र देखील सुरू करावे असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुचवून न.प.ने तशी सुविधा केंद्रात निर्माण करावी, यासाठी निधी देण्यात येईल, असे सांगितले .