Thu, May 23, 2019 20:54
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › 19 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प 

19 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प 

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 11:09PMसावंतवाडी  ; प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपरिषदेचा 18 कोटी 94 लाख 58 हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प नगराध्यक्ष  बबन साळगावकर यांनी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला. कोणतीही दरवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात घरपट्टी व मालमत्‍ता करांमध्ये 23 लाखाची तर पाणीपट्टी करामध्ये 18 लाखाची मिळून 41 लाख रुपयांची उत्पन्नात वाढ झाली आहे. 58 कोटी 2 लाख रुपयांच्या 2017-18 या आर्थिक वषार्ंच्या अर्थसंकल्पात पर्यटन योजनेतील मोनोरेलसाठी सर्वाधिक 2 कोटी रुपये तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुदान व विशेष रस्ता अनुदानसाठी प्रत्येकी 2 कोटी आणि जिल्हास्तर नगरोत्थानसाठी 3 कोटी, 14 वा वित्‍त आयोगासाठी 2 कोटी 25 लाख रुपये निधी राज्य शासनाकडून प्रस्तावित आहे.   

सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेमध्ये 57 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प साळगावकर यांनी सादर केला. मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे, उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, आनारोजीन लोबो, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, मनोज नाईक, भारती मोरे, बाबू कुडतरकर तसेच विरोधी पक्षाचे अ‍ॅड. परिमल नाईक, उदय नाईक आदी उपस्थित  होते. 

सुरुवातीला अर्थसंकल्प 31 जानेवारीपूर्वी सादर करण्याबाबत नगरपालिका अधिनियम असल्याचे विरोधी नगरसेवक अ‍ॅड. परिमल नाईक यांनी सांगितले. मात्र, नियमान्वये  र्थसंकल्प सादर केल्याचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी स्पष्ट केले. नगरपरिषदेकडून ‘निरी’ या संस्थेमार्फत सांडपाणी व्यवस्थापन केले जाणार असून घनकचरा व्यवस्थापन आणि खत  तीसाठी निधी प्रस्तावित केल्याची माहिती नगराध्यक्ष साळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अहवाल अंतर्गत विकेंद्रीत सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी नॅशनल एंव्हॉरोमेंट रिसर्च सेंटर (निरी) या संस्थेच्या तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पासाठी 20 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. घनकचरा खत निर्मिती प्रकल्पासाठी 1 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद आहे.  

पाणीपुरवठा अंतर्गत नवीन पाईपलाईन बदलण्यासाठी 1 कोटी 21 लाख रुपये, रस्ते दुरुस्तीसाठी 4 कोटी 30 लाख रुपये, गटार व नाल्यासाठी  2 कोटी 15 लाख रुपये, जमीन खरेदीसाठी 4 कोटी रुपये, महिला व बालविकास कल्याण कार्यक्रमांतर्गत महिलांना प्रशिक्षण व मशिनरी खरेदीसाठी 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीय कल्याण कार्यक्रमासाठी 20 लाख रुपये, दिव्यांग कल्याण कार्यक्रमासाठी 7 लाख रुपये, अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनेसाठी 10 लाख रुपये, दलितवस्तीतील रस्ते, फूटपाथ, गटार, पथदीप बसविण्यासाठी 20 लाख रुपये, नवीन उद्यानासाठी 12 लाख रुपये, अ‍ॅम्युझमेंट पार्कसाठी 15 लाख रुपये तर वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून शिवाजी चौक ते

लेस्टर गेट फूटपाथसाठी 25 लाख रुपये, स्वच्छ महाराष्ट्र अनुदानातून नवीन शौचालयासाठी 20 लाख रुपये, रस्ते सफाईसाठी 10 लाख रुपये, कचरावाहक गाड्या खरेदीसाठी 20 लाख रुपये, स्मशानभूमी दुरुस्तीसाठी 20 लाख रुपये, मोनोरेलसाठी 2 कोटी रुपये, सौर उर्जा विद्युत निर्मितीसाठी 50 लाख रुपये,  नवीन वीज पोल बसविण्यासाठी 6 लाख रुपये,  हायड्रोलिक शिडी खरेदीसाठी 10 लाख रुपये तसेच बॅ. नाथ पै हॉल दुरुस्तीसाठी 1 कोटी  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. व्यायामशाळेसाठी 15 लाख रुपये, जलतरण तलाव दुरुस्तीसाठी 40 लाख रुपये, रमाई घरकुल योजनेसाठी 25 लाख रुपये, ग्रंथालय पुस्तके खरेदीसाठी 2 लाख रुपये,  घनकचरा साहित्य खरेदीसाठी 5 लाख रुपये तसेच जिमखाना खेळपट्टी दुरुस्तीसाठी 6 लाख रुपये, काझी शहाबुद्दीन हॉल दुरुस्तीसाठी 30 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.  

नगरपरिषदेला विविध विकासनिधीची प्रतीक्षा असून यामध्ये चौदावा वित्‍त आयोग 2 कोटी 25 लाख रुपये, जिल्हास्तर नगरोत्थान अनुदान 3 कोटी रुपये,  राज्यस्तर नगरोत्थान अनुदान  50 लाख रुपये, विशेष रस्ता अनुदान 2 कोटी रुपये, सर्वसाधारण रस्ता अनुदान 35 लाख रुपये, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान 2 कोटी रुपये, भाजी मार्केट अनुदान 5 कोटी रुपये, दलितवस्ती अनुदान 20 लाख रुपये, रमाई घरकुल योजना 25 लाख रुपये, मोनोरेलसाठी पर्यटन योजना अनुदान 2 कोटी रुपये, जिल्हा नियोजन विशेष निधी 1 कोटी रुपये अपेक्षित असून अर्थसंकल्पात याचा उल्‍लेख करण्यात आला आहे.