होमपेज › Konkan › ओवळीये सरपंचासह सात जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

ओवळीये सरपंचासह सात जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी ; प्रतिनिधी 

ओवळीये सरपंच विनायक सावंत व सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्‍ता सावंत यांच्यासह सात जणांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आहे. 21 मार्चला रात्रौ 9.30 वाजता सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्‍ता सावंत व अन्य एका सहकार्‍यांने ओवळीये पोलिस पाटल जाधव यांच्या घरी जाऊन तंटामुक्‍त समिती अध्यक्षांकडे तक्रारीचा अर्ज द्यायचा आहे तो तुम्ही स्वीकारा, अशी विनंती केली. मात्र, जाधव यांनी तो अर्ज अध्यक्षाच्या नावे असल्याने स्वीकारण्यास नकार दिला.

 सौ. सावंत यांनी सरपंच विनायक सावंत यांच्या घरी जाऊन याबाबतची  त्यांना कल्पना दिली. त्यानंतर काही वेळातच सरपंच विनायक सावंत व सौ. सावंत तसेच चंद्रकांत सावंत, हनुमंत सावंत,महादेव सावंत,रोशन सावंत व प्रदीप सावंत  असे एकूण सातजण पोलीस पाटील जाधव यांच्या घरी गेले व त्यानी ‘त्यांना  तू अर्ज घे’असे सांगितले. मात्र, जाधव यांनी नकार दिल्याने सरपंच सावंत यांनी पोलिस पाटील जाधव यांना जातिवाचक  शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.तर  याप्रकरणी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी दयानंद गवस हे तपास करीत आहेत.
 


  •