Sun, Dec 15, 2019 02:09होमपेज › Konkan › सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी पक्ष लढविणार

सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी पक्ष लढविणार

Published On: Jun 16 2019 1:46AM | Last Updated: Jun 15 2019 10:47PM
सावंतवाडी ः प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचा सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केला.राष्ट्रवादी पक्षातर्फे सावंतवाडीसह रायगड आणि रत्नागिरी विधानसभा निवडणूक लढविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्यासह एम. के. गावडे यांचे नाव चर्चेत असून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नावाचीही ही चर्चा सुरू आहे. मुंबई येथे प्रदेश कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करुन लढणार असल्याचेही संकेत यावेळी देण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतवाडी,रायगड व रत्नागिरी  विधानसभेची जागा आपल्याकडे ठेवणार असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 60 टक्के बूथ कमिटी स्थापन केल्याबद्दल जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले.

बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, अमित सामंत,ओबीसी सेलचे बाळ कल्याणकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, सावळाराम अणावकर, एम. डी. सावंत, एम. के. गावडे, नम्रता कुबल, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम बर्डे, कार्यकारिणी सदस्य गुरुदत्त कामत,  अशोक पवार, उपाध्यक्ष रुपेश जाधव, कृषी सेलचे समीर आचरेकर, पूजा पेडणेकर, सावंतवाडी तालुका महिला अध्यक्ष रंजना निर्मळ, कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब, देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव आदी उपस्थित होते.