Wed, Apr 24, 2019 02:06होमपेज › Konkan › ‘चांदा ते बांदा’ योजनेतून विकासाची नवी पहाट!

‘चांदा ते बांदा’ योजनेतून विकासाची नवी पहाट!

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 9:46PMसावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक स्वातंत्र्याची नवी पहाट ‘चांदा ते बांदा’ योजनेंतून उगवणार आहे. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न दुप्पटीपेक्षा जास्त होईल, असा विश्‍वास गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  व्यक्त केला. 
संजीवनी कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. चांदा ते बांदा योजनेच्या जनजागृतीनिमित्त संजीवनी महिला कृषी विकास व बहुउद्देशीय संस्था आणि कोल्हापूर येथील राज इव्हेंटच्या संयुक्त विद्यमाने या शासकीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन येथील जिमखाना मैदानावर करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप ना. केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

 जि.प.गटनेते नागेश परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, कृषी अधिकारी प्रमोद सावंत, संजीव जाधवर, चंदन भडसावे, प्रथमेश सावंत, देविदास मेस्त्री, वेंगुर्ले   सभापती बाळू साळगावकर, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण आदी उपस्थित होते. 

माडखोल, सांगेली, ओरोस येथील तलाव आणि धरणामधून  महिला बचतगटांना मत्स्य शेती करता येण्यासारखी आहे. तसेच कुक्कुटपालन, खेकडा शेती, गोड्या पाण्यातील मत्स्य शेती, मधमाशी पालन असे उद्योग करता येण्यासारखे आहे. यासाठी शासनाकडून 75 टक्के अनुदान दिले जाते. या उद्योगात सहभागी होणार्‍या बचतगटांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.त्यांच्या हस्ते यशस्वी शेतकरी व कृषी पर्यटन करणारे कर्जत येथील सगुणाबागचे उद्योजक चंदन खडसावे व प्रथमेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला.