Mon, Apr 22, 2019 16:31होमपेज › Konkan › सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले कालवश

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले कालवश

Published On: Jul 18 2018 11:07PM | Last Updated: Jul 18 2018 11:17PMसावंतवाडी : पुढारी प्रतिनिधी 

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. सावंतवाडी संस्थानकालीन राजवाड्यात गेले काही दिवस त्या आजारी होत्या. राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत्या. सत्वशीलादेवी यांनी गंजिफा ही हस्तकला अटकेपार पोहचविली होती. त्यांच्या निधनाने अवघ्या सावंतवाडी संस्थानानवर शोककळा पसरली आहे.