Mon, Apr 22, 2019 04:19होमपेज › Konkan › सरपंच सहीसाठी उपलब्ध व्हावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा

सरपंच सहीसाठी उपलब्ध व्हावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 10:20PMचौके : वार्ताहर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सरपंच ग्रामस्थांना विविध दाखल्यांवर व इतर कागदपत्रांवर सही करण्यासाठी नेहमी उपलब्ध असतात. परंतु काही गावांमध्ये सरपंच सहीसाठी नेहमीच उपलब्ध होतातच असे नाही.त्यांच्या घरी जावे लागते.काही वेळा ऑफिसमध्येही मिळत नाहीत.त्यामुळे प्रत्येक गावचा सरपंच सह्यांसाठी उपलब्ध व्हावा,अशी ग्रामस्थांची सर्वसाधारण अपेक्षा आहे.

गावचा सरंपच ग्रामपंचायतीमध्ये किती वेळ,किती तास बसतो?गावाच्या हितासाठी,लोकांच्या  भल्यासाठी निवडून दिलेला सरपंच दररोज ग्रामपंचायतीमध्ये हजर असतो का?आपली दररोज हजेरी लावतो का? लोकांच्या समस्या समजावून घेतो का?सरंपचाच्या सही- शिक्क्यासाठी येणार्‍या लोकांना वेळच्या वेळी ग्रामपंचायतीमध्ये सही -शिक्का देतो का?असे प्रश्‍न अनेक गावांमध्ये विचारले जातात.

पूर्वीच्या काळी गावचा कारभारी मुखीया असायचा. तोच गावचा कारभार चालवत असे.आता गावचा कारभार गावचा प्रथम नागरिक सरंपच चालवतो.गावच्या विकासावर,समस्यावर लक्ष देतो,समस्या सोडवतो.गावचा विकास करतो.नवनवीन योजना आणणे,राबविणे,गावावर लक्ष केंद्रित करणे,लोकांच्या लहान मोठ्या समस्या सोडवितो.अलिकडच्या काही महिन्यापूर्वी गावपातळीवरच्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.प्रत्येक गावातील मतदाराने आपला मूलभूत मतदानाचा हक्क बजावून मतदान केले.आणि आपल्या गावचा प्रथम नागरिक निवडून दिला.काही ठिकाणी अशी परिस्थिती दिसून येते गावातील एखादी व्यक्‍ती सरंपचाच्या सहिसाठी ग्रामपंचायतीमध्ये गेली तर त्या ठिकाणी  सरपंच हजर नसतात अशी स्थिती अनेकदा दिसून येते.विचारणा केली असता कर्मचारी सागतात सरपंच घरी आहेत, त्याच्या घरी जावून सही-शिक्का  घ्यावा लागतो.

सरपंचाच्या घरी जावून सरपंचाची सही घेणे योग्य की अयोग्य.कायद्याच्या बाजूने विचार केला तर  अयोग्य.अशा प्रश्नाना वाचा तरी कधी फुटणार?अशा प्रश्नाकडे लक्ष तरी कोण देणार?असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्‍नांकडे शासनाने,जि.प.ने व वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी काही गावातील ग्रामस्थांमधून होत आहे.