होमपेज › Konkan › नौकेवरुन पडून खलाशी बेपत्ता

नौकेवरुन पडून खलाशी बेपत्ता

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 10:09PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

देवगड बंदरातील द्विजकांत कोयंडे यांच्या नौकेवरील खलाशी गोशीदत्ताप लिंगप्पा किन्नळ(35 रा.यलदुर्ग -कर्नाटक) हा नौकेवरून तोल जावून पाण्यात पडल्याची घटना  9 रोजी पहाटे 4 वाजता देवगड बंदरात घडली. गोशीदत्ताप लिंगप्पा किन्नळ हा देवगड बंदरातील द्विजकांत कोयंडे यांच्या नौकेवर खलाशी असून शनिवारी पहाटे 4 वाजण्याचा सुमारास तो लघुशंकेसाठी उठला.

याचदरम्यान नौकेवरून तो तोल जावून पाण्यात पडला. त्याचा शोध घेवून मिळाला नाही म्हणून नौकामालक द्विजकांत कोयंडे यांनी नापत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली आहे तपास पोलिस नाईक प्रशांत जाधव करीत आहे.