Wed, May 22, 2019 14:51होमपेज › Konkan › प्रमोद जठार : ‘सबका मालिक एक’ महानाट्य  मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ

साईबाबांच्या जीवनचरित्रातून समाज प्रबोधन करणार

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:28PM

बुकमार्क करा

कणकवली : शहर वार्ताहर

शिर्डीच्या श्री साईबाबांनी गरिबी व संकटावर मात करून समाज प्रबोधन केले.  अशा साईबाबांच्या जीवन चरित्रावर महानाटयाची निर्मिती करून जिल्हावासियांना ते पाहण्याची संधी  संदेश पारकर  आयोजक व साईभक्त यांनी दिली आहे. हा चांगला उपक्रम आहे. बदलत्या समाजात साईबाबांच्या जीवन चरित्राचे वाचन होणे गरजेचे आहे. हे महानाटय पुढच्या पिढयांना देखील दाखवणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले.

कणकवली- वागदे  येथे 2 ते 6 फेबु्रवारी या कालावधीत होणार्‍या ‘सबका मालिक एक ’ या महानाटयाचे मध्यवर्ती कार्यालय कणकवली बसस्थानकासमोर  सुरू करण्यात आले. या कार्यालयाचा शुभारंभ प्रमोद जठार यांच्या हस्ते व युवानेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.  नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, अ‍ॅड.उमेश सावंत, प्रा.हरिभाऊ भिसे, नाटकाचे सुत्रधार दीपक परुळेकर, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, अभिनेते अभय खडपकर, दादा कुडतरकर, अशोक करंबेळकर, संतोष काकडे, रुपेश नार्वेकर, दिवाकर मुरकर, प्रसाद अंधारी, विलास गोलतकर, डॉ.विठ्ठल गाड, संजय

मालंडकर, डॉ.विद्याधर तायशेटे, वैशाली आरोलकर, राजू राठोड, सुहास वरूणकर, सोमा गायकवाड, मधुसूदन नानिवडेकर, दीपक बेलवलकर, अभय सावंत आदी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, जिल्ह्याचे कोणतेही आव्हान कणकवली पेलते,  येथील माणसं आव्हाने स्वीकारणारी आहेत. याच विश्‍वासाने कणकवली तालुक्यात ‘सबका मालिक एक’ या महानाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वांना हे महानाट्य यशस्वी करायचे आहे. साईबाबांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत असल्या निमित्त हे महानाट्य होणार आहे. साईबाबांचे जीवनचरित्र त्यांचे चमत्कार आणि अनुभूती या महानाटयातून पहायला मिळणार आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र अनिल पालकर हे महानाट्यात साईबाबांची प्रमुख भूमिका साकारणार आहेत.या महानाट्याच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री, राज्यमंत्री व अन्य नेते मंडळी उपस्थित राहण्यासाठी प्रमोद जठार व आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री.पारकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले. आभार  हरिभाऊ भिसे यांनी मानले.