होमपेज › Konkan › मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्षपदी सदानंदराव भोसले

मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्षपदी सदानंदराव भोसले

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:24PMचिपळूण : शहर वार्ताहर

भारतीय मराठा महासंघाच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी खेड येथील सदानंदराव भोसले यांची निवड झाली आहे. हे नियुक्‍ती पत्र महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष किसनराव वरखिंडे व राष्ट्रीय अध्यक्ष आप्पा आहेर यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष बन्सी डोके यांनी दिले आहे.

या निवडीबद्दल केशवराव भोसले, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष अशोक मोरे, कल्याणचे माजी नगरसेवक हर्षदीप पालांडे, शरद शिंदे, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संताजी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा आशा शेगदार, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रफुल्‍ल पवार, नामदेव पवार, संभाजी ब्रिगेडचे कोकण अध्यक्ष सुधीर भोसले, बळवंत भोसले, सुरेश केदारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या निवडीबाबत सदानंदराव भोसले म्हणाले, आपल्या 35 वर्षांच्या समाजसेवेत समाजाचे आपण काही देणे लागतो या हेतूने ही जबाबदारी स्वीकारली आहे. सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध पुढील रणनीतील ठरविणार आहोत. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत नवे जिल्हाध्यक्ष व कोकण विभागातील कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहोत. या संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.