Fri, Feb 22, 2019 00:11होमपेज › Konkan › सॅकरीनचा गोडवा ठरतोय हानिकारक

सॅकरीनचा गोडवा ठरतोय हानिकारक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

उन्हाच्या तीव्रतेने सध्या चाळीसचा पारा पार केला आहे. या उन्हाची दाहकता सहन करत असताना माणसाच्या अंगाची लाहीलाही होते. त्यापासून दिलासा मिळावा म्हणून आपण रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगडीवरील थंड पेय पिणे पसंत करतो. मात्र, काही ठिकाणी या पेयांमध्ये सध्या सॅकरीन मिसळण्याचे प्रमाण वाढले असून त्याबाबत खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.साखर म्हणून काय वापरले जाते याचा विचार पेय पिताना आपण करणे आवश्यक आहे. पेयांमध्ये काही ठिकाणी सॅकरीन वापरले जात असून ते मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते.सॅकरीन हे सहसा कोल्ड्रिंक्स, कँडी, बिस्किटे, औषधे आणि टूथपेस्टला गोड करण्यासाठी वापरले जाते. साखरेपेक्षा कित्येक पटींनी हा पदार्थ गोड लागतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या काही शीतपेय विक्रेत्यांकडून त्याचा सर्रास वापर केला जातो.

विक्रेत्याला आपल्या हातगाडीवरील शीतपेये माफक दरात विकायचे असते. त्यामुळे त्या पेयात साखर न टाकता काही विक्रेते साखरेचा पाक आहे, असे भासवून सॅकरीनचा वापर करतात. सॅकरीन हा एक प्रकारचा कृत्रिम गोड पदार्थ जरी असला तरी त्याचे सेवन केल्यानंतर किंचित कडू लागतो. हा पदार्थ शरीरात गेल्याने विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका निर्माण होतो. शिवाय डोकेदुखी, श्‍वास घेण्याचा त्रास होणे, त्वचेवर पुरळ येणे, वजन वाढणे यासोबत विविध त्वचारोग होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Tags : Konkan, Konkan News, Saccharins, sweetness, harmful, hockers  


  •