Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Konkan › एस.टी. अपघातात 17 जखमी

एस.टी. अपघातात 17 जखमी

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 9:32PMजैतापूर : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणार्‍या मुंबई-मालवण एस.टी. बसला राजापूर तालुक्यातील नेरकेवाडी येथे झालेल्या अपघातामध्ये 17 जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस दरडीवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. 

यामध्ये मनोहर वामन हर्डीकर (वय 73, रा. कोंड्ये, राजापूर) यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चालक बाबासाहेब गर्जे (46, चिपळूण आगार) व वाहक प्रमोद धुरी (52, मालवण आगार) हे मुंबईहून पहाटे 4 वाजता सुटणारी मुंबई-मालवण एस.टी. बस (एम.एच.020 बी.एल. 2718) घेऊन  मालवणच्या दिशेने जात होते. रविवारी दुपारी नेरकेवाडी येथील एका अवघड वळणावर आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने वळण घेण्याऐवजी समोर असलेल्या दरडीवजा गडग्यावर (बांधावर)वेगात जाऊन आदळली. 

यामध्ये नितीन जगन्‍नाथ तळेकर (50, कणकवली, जि. सिंधुदुर्ग), संजय जयराम पोटले (31, कळसवली, राजापूर), रमेश भिकाजी यादव (61, महाळुंगे,राजापूर), गणपत धोंडू यादव (72, गडी-ताम्हाणे, राजापूर), ओंकार नंदकिशोर थरवळ (22, पाचल, राजापूर), प्रकाश भिवा नाडणकर (50, धोपेश्‍वर, राजापूर ), सुरेश धोंडू केळंबेकर (46, देवाचे-गोठणे, राजापूर), अपर्णा आनंद अमृते (24, नाणार, राजापूर), अर्चना आनंद अमृते (46, नाणार, राजापूर), हरी शिवा बोधवे (58, वायरी, मालवण, सिंधुदुर्ग), हफिजसुल हबीनबी (18, आसाम, सध्या राजापूर), विलास करंजवकर (58, राजापूर), पंकज पांचाळ (23), प्रदीप मेस्त्री (28), शरद पांचाळ (35, तिघे राहणार लांजा) यांच्यासह वाहक प्रमोद राजाराम धुरी (52, मालवण आगार, सिंधुदुर्ग) हे जखमी झाले आहेत. यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. मेस्त्री आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रुग्णांवर तातडीने उपचार केले. यामध्ये मनोहर हर्डीकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. अपघाताबाबत माहिती मिळताच राजापूर आगारातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेत जखमींना मदत केली.