Sat, Apr 20, 2019 10:44होमपेज › Konkan › मांडवी एक्स्प्रेसमधून अज्ञाताकडून दोन प्रवाशांकडील रोकड व मोबाईल लंपास

मांडवी एक्स्प्रेसमधून अज्ञाताकडून दोन प्रवाशांकडील रोकड व मोबाईल लंपास

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 9:45PMकणकवली : शहर वार्ताहर

वॉस्को ते ठाणे असा मांडवी एक्सप्रेसने बोगी नं. 55 मधून प्रवास करणार्‍या पद्मश्री नाईक (रा. वॉस्को-गोवा) आणि इदिता रेजीना फेरारो (53, रा. मुंबई) या दोन प्रवाशांच्या जवळील रोख रक्‍कम, मोबाईल, पर्स असे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबविले. ही घटना मंगळवार 24 एप्रिल रोजी दु. 12.30 वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशनरम्यान घडली. याबाबत दोन्ही प्रवाशांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द कणकवली पोलिसात गुन्हा दाखल केला.

पद्मश्री नाईक आणि इदिता फेरारो या महिला मंगळवार 24 एप्रिल रोजी मांडवी एक्सप्रेसच्या बोगी नं. 55 मधून वॉस्को ते ठाणे असा प्रवास करत होते. कणकवली रेल्वे स्टेशनदरम्यान अज्ञात चोरट्याने पद्मश्री नाईक यांच्याजवळील 5500 रू. किमतीचा लॅनो कंपनीचा मोबाईल व पर्स त्यामधील 900 रू. ची रोख रक्‍कम लंपास केली. तर इदिता फेरारो यांच्याकडील हँडबॅग व त्यातील 700 रू. ची रोख रक्‍कम, पॅनकार्ड, आधारकार्ड व चाव्या असा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सदर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार कणकवली पोलिसांत अज्ञाताविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत. 

Tags : Konkan, Robbery,  Mandovi Express