Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Konkan › सिंधुदुर्गमध्ये ‘ओला’ला रिक्षा चालकांचा विरोध 

सिंधुदुर्गमध्ये ‘ओला’ला रिक्षा चालकांचा विरोध 

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 10:56PMसावंतवाडी : प्रतिनिधी   

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला कंपनीच्या टॅक्सीला  परवाने देण्यास जिल्हा तीन आसनी रिक्षा चालक- मालक संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. या ओला टॅक्सी चालकांच्या 15 ऑगस्ट रोजी होणार्‍या सावंतवाडीतील प्रशिक्षण कार्यक्रमात निषेध व्यक्‍त करण्याचा निर्णय संघटने घेतल्याचे जिल्हा सचिव सुधीर पराडकर यांनी  सांगितले. 

जिल्ह्यातील तीन आसनी रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी  ओला टॅक्सींच्या सावंतवाडी शहरात होणार्‍या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित राहून पालकमंत्री दीपक केसरकर यांना लेखी निवेदन सादर करुन आपली नाराजी  व्यक्‍त करणार आहेत.

ओला टॅक्सी कंपनीचे प्रशिक्षण सावंतवाडी जिमखाना येथे 15 ऑगस्ट ला सकाळी 10 वा. होणार आहे. या ठिकाणी येऊन तीन आसनी रिक्षा चालक मालक संघटना या ओला टॅक्सी कंपनीला जोरदार विरोध करणार असल्याचे पराडकर यांनी सांगितले याबाबत 14 ऑगस्टला रिक्षा चालक- मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची  उभाबाजार येथील संघटनेच्या कार्यालयामध्ये तातडीची बैठक घेण्यात आली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष भाऊ पाटील  उपस्थित होते. जिल्ह्यात लवकरच ‘ओला’ टॅक्सीला परवान ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. याबाबत ओला कंपनीशी संलग्‍न असलेल्या मरियम टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्स, मुंबईच्या संचालिका सना कादरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ओला टॅक्सी कंपनीची सेवा सिंधुदुर्गात सुरु करणार नसल्याचे सांगून येथील ड्रायव्हींग शिकलेल्या बेरोजगारांना मुंबईत रोजगार मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत रिक्षा चालक- मालकांना त्यांच्या व्यवसायात फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यात ओला कंपनीची सेवा सुरु झाल्यास त्यांच्या व्यवसायावर गदा येऊ शकते. असे रिक्षा संघटनेचे म्हणणे आहे