Fri, Jul 19, 2019 23:22होमपेज › Konkan › कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 9:06PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने मतदार याद्या तयार करणे आवश्यक असल्याने पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले तरीसुध्दा अशा व्यक्तींनी विहीत नमुना नं. 18 मध्ये नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. 

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2017 आहे. त्या अनुषंगाने पात्र पदवीधर मतदारांची नव्याने नोंदणी करण्यासाठी 20 डिसेंबर 2017 रोजी स. 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग येथील डी.पी.डी.सी. हॉलमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.शासकीय, निमशाससकीय कार्यालयातील जे पदवीधर अधिकारी, कर्मचारी खालील अर्हता धारण करीत असतील, त्यांनी खालील कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करुन घ्यावी,असे  आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी प्रवीण खाडे यांनी केले आहे.

पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी अर्हता जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि जिल्ह्याची रहिवासी आहे आणि ती 1 नोव्हेंबर 2017 पूर्वी किमान 3 वर्षे भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. 3 वषार्ंचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असेल आणि तो विद्यापीठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल.

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विद्यापीठ किंवा संबंधित संस्था यांनी दिलेले पदवी, पदविका प्रमाणपत्र (राजपत्रित अधिकार्‍याने सांक्षाकित केलेली छायांकित प्रत). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसाधारण वास्तव्याचा (बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईट बिल, पाणी बिल, मोबाईल बिल, टॅक्स पावती, घराचे रजि. पेपर). (आधारकार्ड व रेशनकार्ड सोडून) झेरॉक्स. ओळख, फोटो पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक झेरॉक्स. नावात कोणताही बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला अथवा गॅझेट प्रत जोडावी झेरॉक्स. रंगीत व  सुस्पष्ट फोटो सोबत आणावा.