Sun, Aug 18, 2019 14:51होमपेज › Konkan › महसूल वसुलीत जिल्हा राज्यात अव्वल

महसूल वसुलीत जिल्हा राज्यात अव्वल

Published On: Mar 05 2018 10:40PM | Last Updated: Mar 05 2018 10:38PMसिंधुदुर्गनगरी  : प्रतिनिधी 

शासनाने दिलेल्या 39 कोटी 41 लाख रुपयांच्या महसुली उद्दिष्टाची सिंधुदुर्ग  जिल्ह्याने तब्बल 50 कोटी रुपयांची वसुली करत सिंधुदुर्ग महसूल प्रशासनाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. अद्यापही मार्चअखेर बाकी असून 31 मार्च अखेरपर्यंत उर्वरित महसुली वसुली करून सिंधुदुर्गचे सातत्य कायम ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली. वाढलेल्या या महसुली उत्पन्‍नात गौण खनिज वसुलीचा मोठा वाटा असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

चोरट्या वाळू, रेती गौन खनिज उत्खननाला महसूल प्रशासनाने आळा घालत अधिकृत परवाना धोरण प्रथम हाती घेतले  व उत्खनन होणार्‍या सर्वच गौण खनिजांची रॉयल्टी वसूल करण्यावर जास्त भर देण्यात आला व  यातून तब्बल 23 कोटी रुपयांचे उत्पन्‍न जमा करता आले.