Tue, Mar 19, 2019 20:33होमपेज › Konkan ›

महसूल वसुलीत सिंधुदुर्ग अव्वल
 

महसूल वसुलीत सिंधुदुर्ग अव्वल
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 12:23AMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सन 2017 - 18 या आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीत विक्रम केला आहे. या आर्थिक वर्षासाठी असलेल्या उद्दिष्टा पोटी तब्बल 190 टक्के महसूल वसूल केला आहे. आत्तापर्यंतच्या महसूल वसुलीतील हा एक विक्रम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली करून सिंधुदुर्ग जिल्हा हा महसूल वसुलीत राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्हा प्रशासनाने प्राप्त 39 कोटी 41 लाख 8 हजार उद्दिष्टापोटी तब्बल 74 कोटी 71 लाख 42 हजार रुपयांची महसूल वसुली केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला गत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 39 कोटी 41 लाख 8 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टापोटी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या कुशल नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने तब्बल 74 कोटी 71 लाख 42 हजार रुपये म्हणजेच तब्बल 190 टक्के एवढी विक्रमी महसूल वसुली 27 मार्चपर्यंत पूर्ण केली. उर्वरित तीन ते चार दिवसांमध्येे या वसुलीच्या आकडेवारीत अजून तीन ते चार टक्क्यांची भर पडली आहे. 

ही वसुली 194 ते 195 टक्क्यांपर्यंत गेली असण्याची शक्यता आहे. सर्वांत जास्त महसूल वसुली ही गौण खनिजमधून झाली आहे.