Wed, Nov 14, 2018 14:17होमपेज › Konkan › भारत-नेपाळ रेल्वेमार्ग सर्वेक्षणाची जबाबदारी कोकण रेल्वेकडे

भारत-नेपाळ रेल्वेमार्ग सर्वेक्षणाची जबाबदारी कोकण रेल्वेकडे

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:22PMरत्नाागिरी ः खास प्रतिनिधी

बिहारमधील रक्सौल ते नेपाळमधील काठमांडूपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासंदर्भात फिजिबिलीटी रिपोर्ट तयार करण्याचे काम कोकण रेल्वेला मिळाले आहे. डोंगर-दर्‍यांमध्ाून कोकणात रेल्वे आणून रेल्वेचे अवघड स्वप्न साकार केलेल्या ‘कोरे’वर आता भारत - नेपाळदरम्यान रेल्वे मार्ग उभारण्यासंदर्भातील ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहेे

जम्मू-काश्मीरमधील उंचच उंच खोर्‍यांमधून जाणारा अवघड रेल्वे मार्ग असो की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस द्रुतगती मार्गावरील भुयारे उभारणीचे काम  ज्यामध्ये कोकण रेल्वेच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी आपले कौशल्य पणाला लावून भौगोलिक प्रतिकूलतेवर मात करीत अवघड काम विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. 

कोकण रेल्वेकडील अशा कामाचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन बिहारमधील रक्सौल ते काठमांडू (नेपाळ) दरम्यान उभारण्यात येणार्‍या 200 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करुन फिजिबिलिटी अहवाल तयार करण्याचे काम कोकण रेल्वेला मिळाले आहे. नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही देशांना जोडणार्‍या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती दिली होती.

भारत - नेपाळ दरम्यानच्या या मार्गामुळे हे दोन्ही शेजारी देश रेल्वे मार्गाने थेट जोडले जाणार आहेत. कोकण रेल्वेकडे असे अवघड प्रकल्प साकारण्याचा पूर्वानुभव असल्याने भारत - नेपाळ दरम्यान उभारण्यात येणार्‍या रेल्वे मार्गाचे काम सोपविण्यात आले आहे.