Thu, Jan 17, 2019 18:25होमपेज › Konkan › खेड पोलिस ठाण्यात मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

खेड पोलिस ठाण्यात मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 8:58PMखेड : प्रतिनिधी

येथील पोलिस ठाण्यात मंगळवार दि. 5 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास पोलिस कर्मचार्‍यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.यावेळी बँक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, कर्मचार्‍यांनी विविध विषयांवर माहिती दिली. खेड येथे पोलिस कल्याण सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी गांधी, स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जे. पी. सिंग, ध्येय फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश खेडेकर, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड,  वर्षा शिंदे, पोलिस उपनिरीक्षक बाबुराव धालवलकर यांच्यासह पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, राखीव दलातील जवान, रत्नागिरी येथील श्‍वान पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बँकेच्या अधिकार्‍यांनी सरकारी कर्मचार्‍यांना बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. बँकेच्या अधिकार्‍यांनी एटीएम सुरक्षितता, ऑनलाईन बँकिंग आदींविषयी मार्गदर्शन केले. ध्येय फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश खेडेकर यांनी पोलिस कर्मचार्‍यांना सामाजिक बांधिलकीतून संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शाळा सुरू होणार असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मुलांना लागणारे दाखले मिळवून देण्यासाठी फाऊंडेशनतर्फे सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.