Tue, Jul 16, 2019 01:42होमपेज › Konkan › शैक्षणिक संस्थांच्या समस्या सोडवू

शैक्षणिक संस्थांच्या समस्या सोडवू

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:20PM

बुकमार्क करा
चिपळूण : शहर वार्ताहर

कोकणातील शिक्षण संस्थांचे प्रश्‍न आपल्याकडे घेऊन या. या शिक्षण  संस्था कोणत्याही पक्षाशी संबंधित असोत, आपण त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदारी घेऊ, असे आश्‍वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. मिरजोळी येथे मुस्लिम अंजुमन मुंबई संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु. कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन ना. तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गुरुवारी (दि. 11) सायंकाळी मिरजोळी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नॅशनल इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे ना. तावडे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करीत आहे. त्यामुळे आपल्याला याचा अभिमान आहे.

कोकणात अशा शैक्षणिक संस्था व्हायला हव्यात. मिरजोळीशी आपले भावनिक नाते आहे. ज्येष्ठ विचारवंत हमीद दलवाई व मेहरुन्‍निसा दलवाई यांच्यामुळे आणि खा. हुसेन दलवाई यांच्या आग्रहाखातर आपण इथे आलो. अशाचप्रकारे कोकणात शैक्षणिक काम होत असेल तर ते आपल्याला आवडेल. येथील शैक्षणिक संस्थांनी आपल्या समस्या शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून आपल्यापर्यंत द्याव्यात. त्या सोडविण्याची आम्ही ग्वाही देतो, असे आश्‍वासन दिले.

यावेळी विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. हुसेन दलवाई, संस्थेचे अध्यक्ष अब्दुल्ला दलवाई, माजी आमदार रमेश कदम, बापू खेडेकर, डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, सभापती पूजा निकम, नराध्यक्षा सुरेखा खेराडे, डॉ. समीर दलवाई, उद्योजक हिराभाई बुटाला, दाऊद दलवाई, समशेर दलवाई, हसन दलवाई, रिहाना दलवाई, इबा्रहिम दलवाई, जावेद दलवाई, खालिद दलवाई आदी उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी माणिकराव ठाकरे यांनीदेखील मिरजोळी येथील या शैक्षणिक संस्थेचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला राजकीय कार्यकर्ते, पंचक्रोशितील ग्रामस्थ, नगरसेवक उपस्थित होते. यानंतर व्यायामशाळा, वाचनालयाचे उद्घाटन झाले.