Sun, Jul 21, 2019 10:10होमपेज › Konkan › मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार : पाटील

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार : पाटील

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 11:28PMकणकवली : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारचे वेळकाढू धोरण अजिबात नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमचीही भूमिका आहे. मागास आयोगाने 15 नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. दर 15 दिवसांनी त्याचा प्रगती अहवाल घेतला जात आहे. 

राज्य सरकार मराठा समाजाला याच टर्ममध्ये टिकणारे आरक्षण देईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री आणि  मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष ना.चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कणकवलीत पत्रकारांशी बोलताना दिली. 

मराठा समाज आरक्षणासाठी गेल्या महिन्यात राज्यभर आंदोलने झाली होती. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारवर दबाव वाढला आहे. सरकारने 3 महिन्यांत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर ना.चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाज आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, असेही ते म्हणाले.