Wed, Jul 17, 2019 00:37होमपेज › Konkan › राणे यांनी कॅसिनोमधील फोटो जाहीर करावेतच

राणे यांनी कॅसिनोमधील फोटो जाहीर करावेतच

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 11:10PMकणकवली : प्रतिनिधी

खासदारकीसाठी नारायण राणे यांनी दिल्लीत भाजपशी हातमिळवणी केली, पिंगुळीत मनसेशी युती केली, कणकवलीत राष्ट्रवादीशी आघाडी केली. राणे यांनी आता प्रवेश करण्यासाठी व युतीसाठी एकही पक्ष शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता सिंधुदुर्गातील जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. राणे यांनी कॅसिनोतील फोटो आताच जाहीर करावेत, म्हणजे राणेंना आणि जनतेलाही कॅसिनोत कोेण कोण जातात हे समजेल, असे आव्हान शिवसेना आ. वैभव नाईक यांनी दिले. 

कणकवलीतील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरसेवक सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत उपस्थित होते. आ. वैभव नाईक म्हणाले, शहरातील गाड्या जाळपोळ, वेंगुर्ले राडा आदी प्रकरणात कोण होते हे कणकवली शहरवासीयांना चांगलेच माहीत आहे. अशा प्रवृत्तींना कणकवलीकर थारा देणार नाहीत. आ. नितेश राणे म्हणतात, देवगड नगरपंचायतीत आपण विकास केला, पण त्यांनी सांगावे की जिल्हा नियोजन व्यतिरिक्‍त किती निधी आला, किती आरक्षणे विकसीत केली, याउलट मालवण नगरपरिषदेची अनेक वर्षे रखडलेली भुयारी गटार योजनेसाठी

आपण मुख्यमंत्र्यांच्या सहाय्याने 9 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. कुडाळ न. पं. साठी अद्ययावत नाट्यगृह आणि क्रीडांगण उभारण्याचे काम सुरू केले असेही आ. वैभव नाईक म्हणाले. राणे यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, कणकवलीतच नव्हे तर जिल्ह्यातही आमचे अनधिकृत बांधकाम नाही. सुशांत नाईक यांच्या ज्या बांधकामाबाबत विरोधकांनी उपोषण केले होते, त्याबाबही जिल्हाधिकार्‍यांनी क्‍लिनचिट दिली आहे. आमचा एकही अनधिकृत धंदा नाही की आमच्यावर एकही खंडणीचा गुन्हा नाही. आ. नितेश राणे आपली आमदारकी टिकविण्यासाठी वडिलांच्या सोबत सभेला उपस्थित राहत नाहीत. ते कणकवली शहराचा विकास काय करणार? असा सवालही त्यांनी केला. 

Tags : Casino Photo, Shivsena, Vaibhav Naik, Narayan Rane