Mon, Mar 25, 2019 09:38होमपेज › Konkan › रिफायनरी प्रकल्प शिवसेनाच हद्दपार करणार : राऊत

‘रिफायनरी प्रकल्प शिवसेनाच हद्दपार करणार’

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:24PMराजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यात नाणार परिसरात होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हटविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चोख भूमिका बजावली आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या वल्गना काही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी नाणारला प्रत्यक्ष भेटून केल्या मात्र हा प्रकल्प रद्द करण्याची धमक फक्त आणि फक्त शिवसेनेतच आहे. शिवसेना या प्रकल्पाला तडीपार करताना जनतेच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी मुंबई येथे आयोजित सेनाभवनातील बैठकीत केली आहे.

नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पाचे आंदोलन तीव्र करण्यासाठी या परिसरातील चाकरमान्याची बैठक नुकतीच मुंबईमधील सेनाभवनात पार पडली.

या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जितेंद्र जानवळे, वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, राजापूर तालुका संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, मुंबई तालुका बबन सकपाळ, नगरसेवक वसंत नकाशे, उपविभाग प्रमुख प्रकाश वाघधरे, गिरीश विचारे, अनंत गुरव, नामदेव नार्वेकर, विद्याधर पेडणेकर, नाना मसूरकर, संदेश खडपे आदी मान्यवर उपस्थित होते. 

ही सभा खा. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी नाणार परिसरातील प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. ज्या शिवसेनेच्या पाठीशी आतापर्यत कोकणी जनता ठामपणे उभी राहीली आहे, त्या जनतेच्या विश्‍वासाला शिवसेना कधीच तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी दिली. 

जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, उपाविभागप्रमुख प्रकाश वाघधरे यांनी मार्गदर्शन करताना कोकणातील होऊ घातलेला हा प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. यावेळी नाणार परिसरातील मुंबईकर प्रकल्पग्रस्त, तालुक्यातील नागरीक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.