Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Konkan › अखेर रेडी पूल वाहतुकीस खुला, वाहनचालकांमधून समाधान

अखेर रेडी पूल वाहतुकीस खुला, वाहनचालकांमधून समाधान

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:07PMशिरोडा : वार्ताहर

गेल्या महिन्यापासून दुुरुस्ती सुरु असलेल्या रेडी पुलाचे काम पूर्ण झाल्याने 26 जानेवारीचे औचित्य साधून  हा पूल वाहतुकीसाठी खुला  करण्यात आला.  रेडी पूल कमकवूत झाल्याने या पुलाची दुरुस्ती सुरू होती. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने पुलासाठी निधी प्राप्त झाला होता.गेल्या सहा महिन्यापासून पुलावरुन अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. 

माजी सभापती अजित सावंत यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. यावेळी संतोष मांजरेकर, नंदू मांजरेकर, बाळा रेडकर, रफिक बेग, प्रफुल्‍ल सौदागर, जगन्नाथ वारखंडकर, मोतेल डिसोजा आदी उपस्थित हेाते.