Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Konkan › अखेर भाजपचे रवींद्र बावधनकर शिवबंधनात

अखेर भाजपचे रवींद्र बावधनकर शिवबंधनात

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 10:39PMराजापूर : प्रतिनिधी

राजापूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगत येत असतानाच गतवेळी भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे रवींद्र बावधनकर यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात हा प्रवेश पार पडला. एक कुशल संघटक म्हणून बावधनकर यांचा परिचय असून खा. राऊत यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्यासमवेत राजन करंगुटकर व अन्य कार्यकर्ते यांचाही सेना प्रवेश झाला. रवींद्र बावधनकर यांच्यासारखा खंदा कार्यकर्ता शिवसेनेत यावा, म्हणून आ. राजन साळवी यांनी मोठी भूमिका बजावली होती.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.  या प्रवेशावेळी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती अभिजीत तेली, शहर प्रमुख संजय पवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय मेळेकर, अवजड वाहतूक सेनेचे सचीव दिनेश जैतापकर, नगरसेवक अनिल कुडाळी यांसह सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.