Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Konkan › राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे आंदोलन

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 9:13PM

बुकमार्क करा

रत्नागिरी ः प्रतिनिधी

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी शाखेतर्फे निदर्शने करण्यात आली.  यावेळी प्रलंबित मागण्यांसाठी मागणी दिन आंदोलन करताना राज्य शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा  निषेध करण्यात आला.

यासंदर्भात 5 नोव्हेंबरला जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारी कर्मचार्‍यांना केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, सातव्या वेतन आयोगाच्या  सर्व प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यात यावी, त्यांना केंद्राप्रमाणेच सर्व वाबींची पूर्तता करण्यात यावी, सरळसेवा भरतीने होणार्‍या भरतीत राज्य सरकारी कर्मचार्‍यांना बढती मिळावी, जुन्या

पेन्शनप्रमाणे पेन्शन योजनेतील तरतुदी लागू कराव्यात आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या मागण्याबाबत सकारात्मक विचार न झाल्यास आगामी काळात राज्यसतरावर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी संघटनेेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे.