Sat, Jul 20, 2019 23:42होमपेज › Konkan › ग्रा.पं. कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाईन

ग्रा.पं. कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाईन

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:09PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त माध्यमातून राबविण्यात येणार  आहे. ग्रामसेवकामार्फत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची सर्वंकष माहिती ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतन प्रणालीवर भरण्यात येईल व ही माहिती संबंधित गटविकास अधिकार्‍यांकडून प्रमाणित करण्यात येईल. 

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे नाव, जन्मतारीख, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा दिनांक, कार्यालयीन उपस्थिती, आधार क्रमांक, बचत खाते क्रमांक, भविष्य निर्वाह निधीचे संयुक्त खाते क्रमांक आणि वेतन अनुदान याबाबतची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकार्‍यांकडे राहणार  आहे.  ग्रामसेवकांनी प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ही माहिती ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतन प्रणालीवर अनिवार्य आहे.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना देय असणारा राहणीमान भत्ता हा ज्या दिवशी कर्मचार्‍यांच्या वेतन अनुदानाची रक्कम एचडीएफसी बँकेमार्फत संबंधित कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या बँक खात्यावर जमा होईल त्या दिवसापासून तीन दिवसांच्या आत ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनाकरिता ग्रामपंचायत कर्मचारी ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये नोंदविण्यात आलेल्या खात्यावर जमा करावयाचा आहे.